संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील कडवई नदीपात्रात आंबवमध्ये विषारी औषध प्राशनाने प्रौढाचा मृत्यू

संगमेश्‍वर तालुक्यातील तुरळ हरेकरवाडी येथील कडवई नदीपात्रात आंबवमध्ये विषारी औषध प्राशनाने प्रौढाचा मृत्यू
संगमेश्‍वर तालुक्यातील आंबव कोंडकदमराव घाटगेवाडी येथील ५५ वर्षीय प्रौढाचा विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
राजाराम सीताराम घाटे असे मृत प्रौढाचे नाव आहे. याबाबत वसंत सीताराम घाटे यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी घाटे बंधू शेतातून काम करून घरी आले, यानंतर राजाराम घाटे हे घराबाहेर असलेल्या बाथरूममध्ये गेले. तेथून अंगणातील खुर्चीत येवून बसले. त्यांना अचानक उलट्या होवू लागल्या. दरम्यान राजाराम घाटे यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय घरच्या मंडळींना आला. त्यांना विचारणा केली असता गोचिड मारण्याचे औषध दारू म्हणून प्राशन केल्याचे सांगितले. त्यांना तात्काळ देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने दुपारी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button