
उत्कृष्ट नृत्य सादर करीत चिपळूणच्या एन. के. कलामंचाचा आसाममध्ये डंका
चांगसरी चौकीगेट आजाम (गुवाहाटी) येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कलासंगम महोत्सवामध्ये चिपळूणच्या एन. के. कलामंचाने उत्कृष्ट नृत्य सादर करीत चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या कलामंचाला महोत्सवात विशेष सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उत्तम नृत्य सादरीकरणाने आंतरराष्ट्रीय कला संगम महोत्सवातील मानाचा आंतरराष्ट्रीय नृत्यम सन्मान या कलामंचाने पटकावला. विविध राज्यातील कलाकार या महोत्सवात सहभागी झाले होते. नृत्यदिग्दर्शक सुयोग अनंत जावळे, सांभवी मयेकर, दीक्षा गावणंग, सानिका सावंत, रूपाली कदम, सुनिल चव्हाण आणि दीपेश घाणेकर यांचा कलामंचाच्या संघात समावेश होता. त्यांना आमदार शेखर निकम आणि रत्नागिरी जिल्हा सांस्कृतिक विभाग अध्यक्ष देवराज गरगटे यांचे विशेष सहकार्य लाभले.www.konkantoday.com




