उनाड गाईने उकळत्या तेलाची कढई उडविल्याने चार ते पाच जण भाजले; रत्नागिरीत धक्कादायक प्रकार!

रत्नागिरी शहरातील राम आळी नाका परिसरात एक धक्कादायक घटना घडली. चिप्स बनविणाऱ्या दुकानासमोर उकळत्या तेलाची कढईत अचानक आलेल्या गाईने तोंड घालून कढई बाजूला ढकलल्याने चार ते पाच नागरिक भाजण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित गाय देखील भाजली आहे.

राम आळी नाक्यावरील एका दुकानासमोर उकळत्या तेलात चिप्स बनविण्याचे काम सुरू असताना अचानक एक उनाड गाय त्या ठिकाणी आली. उकळत्या तेलाच्या कढईकडे तोंड घालताच ती गाय चांगलीच भाजली. वेदनेमुळे संतप्त झालेल्या गाईने शिंगाने कढई उडवली. त्यामुळे उकळते तेल आजूबाजूला उडून या परिसरात उपस्थित असलेले चार ते पाच जण भाजले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी नागरिकांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे समजते.

या घटनेमुळे शहरातील उनाड गुरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button