एटीएम कार्डची माहिती घेऊन ३९ हजाराची फसवणूक

रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे माऊली आदर्श नगरमध्ये राहणाऱ्या अच्युत पाटणकर यांची ऑनलाइनद्वारे ३९ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे
पाटणकर हे घरी असताना एका मोबाइलवरून त्यांना हिंदीत बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने फोन करून विचारले की तुमचे एटीएम आहे का ते एटीएम तुम्ही वापरले आहे का असे प्रश्न विचारले त्यावेळी पाटणकर यांनी सदर व्यक्तीला मी बँकेत जाऊन खात्री करतो असे सांगितल्यावर त्या व्यक्तीने तुम्ही बँकेत गेल्यास तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक होणार आहे तुम्ही आम्हाला एटीएम कार्डची माहिती द्या आम्ही ते चालू करतो असे सांगून सदर अज्ञात व्यक्तीने पाटणकर यांच्याकडून एटीएमचे डिटेल माहिती घेतली त्यानंतर पाटणकर यांच्या बँक खात्यातील ३९ हजार रुपये अज्ञात इसमाने काढून घेतले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटणकर यांनी शहर पोलीस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button