
मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरातील सोनवी पुलाचे काम वेगात
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाच काम संगमेश्वर शहर परिसरात दीर्घकाळ रखडल्याने वाहनचालक व स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. तासनतास वाहतूका कोंडी, अपघाताचा धोका आणि रोजचा मनस्ताप याबाबत एका दैनिकाने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण कधी होणार? याचा जाब विचारण्यासाठी जनआक्रोश समितीने रस्ता रोको आंदोलन छेडले होते. या आंदोलनप्रकरणी ३५ जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. संगमेश्वर शहर दरम्यान रखडलेल्या कामाबाबत लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर दोन दिवसांपूर्वी या कामाला वेग मिळाला आहे. संगमेश्वर सोनवी दरम्यान असलेल्या पुलाचे काम झपाट्याने सुरू करण्यात आले असून या एका बाजूचे काम हाती घेण्यात आले आहे.www.konkantoday.com




