
डिसेंबर 2025 अखेरच्या संपणाऱ्या तिमाहीची विवरण पत्र ई आर १ मधील माहिती सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी
रत्नागिरी, दि. 12 ):- डिसेंबर 2025 अखेरच्या संपणाऱ्या तिमाहीची विवरण पत्र ई आर १ मधील माहिती सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत सादर करुन सहकार्य करावे, असे आवाहन प्र. सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मो.ए. दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी सेवायोजन कार्यालय ( रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणे) कायदा 1959 व नियम 1960 5 (1) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय तसेच कलम 5 (2) अन्वये खासगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विषयांकित कायद्यातील तरतूदीनुसार विहीत नमुना ई आर 1 नियमितपणे महाराष्ट्र शासनच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावरुन त्यांना देण्यात आलेल्या युझर आय डी व पासवर्ड च्या माध्यामातून लॉग इन करुन ऑनलाईन पद्धतीने सादर करुन सहकार्य करावे. आधिक माहिती करिता या कार्यालयातील लिपिक – टंकलेखक ज.द.गोपतवाड यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9860607995 यावर संपर्क साधावा.




