रत्नागिरी शहरा जवळील खेडशी महालक्ष्मी मंदीर रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात,दोन जण जखमी


रत्नागिरी शहरा जवळील खेडशी महालक्ष्मी मंदीर रस्त्यावर कार आणि दुचाकीचा अपघात होऊन या दोन जण जखमी झाले आहेत

शशिकांत गजानन सनगरे (वय ३७ रा. हातखंबा ) व जान्हवी शशिकांत सनगरे (वय ३२) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ही घटना बुधवारी (ता. १४) सायंकाळी पाचच्या सुमारास खेडशी महिलक्ष्मी मंदिर येथील सुचना फलका जवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत सनगरे हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एफ ०४१३) सोबत पत्नी जान्हवी हिस मागे बसवून सायंकाळी हातखंबाहून रत्नागिरीकडे येत होते. ते खेडशी येथील महालक्ष्मी मंदिर येथील रस्त्यावर आले असताना दिशा दर्शक (डायव्हर्शन) येथे मागून येणारी मोटार (क्र. एमएच-०८ एएक्स ८२८७) वरिल चालक ओमकार रवींद्र मांडवकर (वय ३१, रा. गोळप, ता. जि. रत्नागिरी) यांना दिशादर्शक (डायव्हर्शन) न कळल्याने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरिल दाम्पत्य शशिकांत व जान्हवी सनगरे ही दोघ गंभीर जखमी झाली. जखमींना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button