रत्नागिरी शहरातील शहरातील रामआळी भागातील सहकारी बँकेसमोर असलेल्या फुटपाथवरील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपलेल्या एका फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या वॉचमनने केला जीवघेणा हल्ला


रत्नागिरी शहरातील शहरातील रामआ ळी भागातील सहकारी बँकेसमोर असलेल्या फुटपाथवरील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपलेल्या एका फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या वॉचमनने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी सुमारे आठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संबंधित फिरस्ता व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम आणि परिसरातील एका बँकेबाहेर असलेल्या मोकळ्या पॅसेजमध्ये सदर फिरस्ता व्यक्ती शनिवारी रात्री झोपली होती. रविवारी सकाळी बँकेच्या वॉचमनने त्या व्यक्तीला तेथून उठून जाण्यास सांगितले. मात्र झोपलेली व्यक्ती उठण्यास तयार नसल्याने वॉचमनचा संताप उफाळून आला.या रागाच्या भरात वॉचमनने हातात असलेल्या स्टीलच्या रॉडने फिरस्त्या व्यक्तीवर बेछूट हल्ला केला. हल्ला इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता पोलिसांनी घटनास्थळी येऊन तातडीने तपास सुरू केला आहे वॉचमनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button