निषेध नोंदवूनही मटके चालकांवर कारवाई नाही खेडमध्ये पत्रकारांचे उपोषण

खेड ः येथील वृत्तपत्र कार्यालयात शिरून पत्रकारांना दमदाटी केल्यानंतर त्याच दिवशी रात्री दोन पत्रकारांना मारहाण करण्यात आली. हा निंदनीय प्रकार येथील मटका जुगार अड्डेवाल्यांनी केला. याबाबतच्या तक्रारी दाखल होवूनही ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांचे पत्रकार आज २० जून रोजी येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
३ जून रोजी हा प्रकार घडला होता. मटका जुगार अड्डेवाले दिनकर उर्फ बारक्या लोहार यांच्यासह अजय चव्हाण, अनिकेत खेडेकर, प्रभाकर लोहार व माणिक लोहार यांच्यावर तडीपारीच्या कारवाईसह मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांनी केली आहे. याआधी जिल्ह्यातील पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button