सोयीनुसार रंग बदलणे म्हणजेच कॉंग्रेसचे राजकारण : आ. रविंद्र चव्हाण यांची कॉंग्रेसवर टीका


भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल करीत सोयीनुसार रंग बदलणे म्हणजेच कॉंग्रेसचे राजकारण असल्याची टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका व्हिडीओच्या आधारे त्यांनी कॉंग्रेसच्या दुटप्पी धोरणावर निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील भाजप विधिमंडळाच्या बैठकीत बोलताना अमित शाह यांनी, ज्या राज्यांमध्ये गेल्या अनेक दशकांत कॉंग्रेसचा एकही मुख्यमंत्री झालेला नाही, त्या राज्यांतील वास्तव मांडले.
राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, देशातील जनता सातत्याने त्यांच्याविरोधात कौल देत असल्याचे शाह म्हणाले. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी आता पुन्हा मोडकळीस येत असल्याची टीका त्यांनी केली. व्होट चोरीचा खोटा आरोप करणारे कॉंग्रेसी नेते या मुद्द्यावर मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत, असे म्हणत रविद्र चव्हाण यांनी चोराच्या उलट्या बोंबा अशा शब्दांत कॉंग्रेसच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. कॉंग्रेसने आत्मचिंतन करण्याची वेळ आली असून देशातील जनता त्यांच्या अपयशावर स्पष्ट कौल देत असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी ठाम भूमिका माजपने माडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button