नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या सोबतची महामार्गप्रश्नी बैठक निष्फळ


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात चिपळूण शहरातील बौद्धवाडी परिसरात अंडरपास मंजूर न झाल्याने सद्यस्थितीत सुरू असलेले काम नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी बुधवारी बंद पाडले. यानंतर गुरुवारी सकाळी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात महामार्ग, नगर परिषद अधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष सकपाळ यांनी जोपर्यंत अंडरपास मंजूर होत नाही तोपर्यंत काम करू न देण्याची भूमिका कायम ठेवल्याने बैठक निष्फळ ठरली.
शहरातून जाणार्‍या महामार्ग चौपदरीकरणात बौद्धवाडी परिसरात अंडरपास उभारण्यात यावा, अशी गेल्या ६ महिन्यांपासूनची मागणी प्रलंबित असल्याने बुधवारी नगराध्यक्ष सकपाळ यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन सुरू असलेले महामार्गाचे काम बंद पाडले. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र कुलकर्णी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, उपअभियंता मुल्ला, शाखा अभियंता श्याम खुणेकर तसेच ठेकेदार कंपनीचे जयंतीलाल नाणेचा यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button