आर एच पी फाउंडेशनच्या सहकार्यातून दिव्यांग रघुनाथ गोरे यास निओ मोशनची यांत्रिक व्हील चेअर गाडी मिळाली

रत्नागिरी. :- रघुनाथ भगवान गोरे वय 39वर्ष मु पो तिसंगी ता.खेड जि रत्नागिरी.सात महिन्याचे असताना पोलिओ झाला त्यात दोन्ही पायांना 90%अपंगत्व आले कधीच चालता आले नाही.पहिलीपासुन चुलत्यानी पिंपरी चिंचवाड अपंग विद्यालय या शाळेत शिक्षणासाठी ठेवले. 9वी पर्यंत शिक्षण झाले. 2004साली शाळा सोडली आणि गावी वडिलांना शेतीत मदत करू लागले.ट्रायसिकल चालवायचे. शेतीत नुकसान झाल्याने आई शेवंता आणि वडील भगवान यांनी शेळीपालन हा व्यवसाय चालु केला.रघुनाथ शेळीपालनात साफसफाई करून मदत करायचे. पाचवर्षापासून रत्नागिरीच्या अशादीप या अपंगासाठी काम करणाऱ्या संस्थेत विध्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे काम करू लागले.तिथे संस्थेतच राहण्याची जेवणाची सोय आहे.
उद्योग धंद्यासाठी कर्ज काढायचा विचार सुरु होता तेव्हा त्यांच्यामित्रामुळे आर एच पी फाउंडेशन या संस्थेची माहिती मिळाली. संस्थेचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांना जाऊन भेटलो.त्यांनी व्यवसायासाठी कर्ज काढणे विषयी मार्गदर्शन केले.पण ट्रायसिकल हाताने चालवून व्यवसाय करणे खूप अवघड जाणार म्हणून त्यांनी संस्थेच्या माध्यमातून निओमोशन या इलेक्ट्रॉनिक गाडी मिळवून देणेसाठी प्रयत्न सुरु केले.स्नेहज्योत दिव्यांग प्रतिष्ठान बोरिवली मुंबई या संस्थेत नाव नोंदणी केली. या संस्थेतर्फे तीन जणांना गाडी मिळाली. त्यात आर एच पी फाउंडेशन यांच्या सहकार्याने रघुनाथ गोरे यांना निओमोशनची गाडी मिळाली. आता त्यांना निओमोशन वरून लांब अंतरापर्यंत जाऊन काम करणे सहज शक्य होणार आहे. शारीरिक त्रास खूप कमी होणार आहे त्यामुळे रघुनाथ खूप खुश आहेत. नवनवीन व्यवसायाच्या कल्पना करायला लागले आहेत.त्यांच्यातला उत्साह आणि आत्मविश्वास वाढला आहे. त्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आर एच पी फाउंडेशन आणि स्नेहज्योत दिव्यांग प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button