मिरकर वाड्यातील महिला मत्स्य व्यावसायिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या दुकानांची पालकमंत्री उदय सामंत यांचेकडून पाहणी


व्यवसायातील अडचणी जाणून घेत दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना


रत्नागिरी : राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मिरकरवाडा येथे महिला मत्स्य व्यावसायिकांसाठी उभारण्यात येत असलेल्या दुकानांच्या कामाची पाहणी केली.

यावेळी सामंत यांनी महिला मत्स्य व्यावसायिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या दैनंदिन व्यवसायात येणाऱ्या अडचणी, आवश्यक सुविधा आणि अपेक्षा जाणून घेतल्या. महिलांना व्यवसायासाठी सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि सोयीस्कर वातावरण उपलब्ध व्हावे, यासाठी सुरू असलेल्या कामाची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.

दुकानांच्या कामामध्ये आवश्यक त्या सुधारणा करून बांधकामाचा दर्जा उत्तम राखावा तसेच काम वेळेत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिल्या. महिला मत्स्य व्यावसायिकांना व्यवसाय करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक सुविधांचा समावेश करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

मिरकरवाडयातील महिला मत्स्य व्यावसायिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या या सुविधांमुळे त्यांच्या व्यवसायाला अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित स्वरूप मिळण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button