रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तरुण अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी आपले अध्यक्षपदाचे मानधन कायमस्वरूपी मुख्यमंत्री निधीसाठी देऊन निर्माण केला आदर्श

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे तरुण तडफदार अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी आपल्या अध्यक्षपदाचे मिळणारे मानधन कायमस्वरूपी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्धार जाहीर करून जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे कोराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्याला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने यांनी आपण अध्यक्षपदा वर कार्यरत असेपर्यंत आपणाला मिळणारे अध्यक्षपदाचे मानधन कायमस्वरूपी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले आहे याआधी त्यांनी केल्या महिन्याचे मानधनाचा चेकही मुख्यमंत्री निधीसाठी दिला होता त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱयांनी आपले एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या बने यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button