
पोलिसांच्या गस्ती नौका दुरूस्तीमुळे बंद, भाड्याच्या दोन गस्त नौकांवर महिन्याला ६ लाखांचा खर्च
रत्नागिरी जिल्ह्याला मोठा सागरी किनारा लाभलेला असून, तो सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी – हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरीत पोलिसांना मिळालेल्या आठ स्पीड बोटी गेल्या आठ महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे किंवा दुरुस्तीअभावी बंद आहेत. यावर उपाय म्हणून पोलिसांनी भाड्याच्या मासेमारी नौका (फिशिंग बोटस) घेऊन त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेसाठी गस्त सुरू केली आहे.
सागरी सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि वेगवान स्पीड बोटींची आवश्यकता असते. पण पोलिसांच्या स्पिड बोटी बंद असल्याने, नाइलाजास्तव साध्या मासेमारीच्या बोटींचा वापर करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. दहशतवादासारख्या संकटात हे पाऊल पूरेसे ठरणार नाही, हे उघड आहे. बंद पडलेल्या या आठ स्पीड बोटी दुरूस्तीसाठी गोवा किंवा मुंबईला न्याव्या लागणार आहे. ही बाब खर्चिक आणि वेळकाढू आहे. त्यामुळे बोटींच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
www.konkantoday.com



