
कोरोना विरुद्ध जनजागृतीसाठी आमदार नितेश राणे रस्त्यावर उतरले
जनतेच्या कोरोणा मुक्त आरोग्यासाठी आमदार नितेश राणे यांनी रस्त्यावर उतरून प्रचार केला.जनतेने कोरोना पासून सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी याचे कणकवली-फोंडाघाट बाजारापेठमधून लाऊड स्पीकर वरून जनतेला आमदार नितेश राणे यांनी आवाहन केले.आपली जनता सुरक्षित राहिली पाहिजे आणि सिंधुदुर्ग जिल्हा,राज्य आणि देश कोरोना मुक्त करावयाचा असेल तर प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.लॉकडाऊन चे नियम पाळले पाहिजेत, गरज असेल तरच घराबाहेर पडावे तेही सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून असे आवाहन त्यांनी केले.
www.konkantoday.com



