
चिपळूण तालुक्यात शेतात काम करताना अंगावर वीज कोसळल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, सहकारीही जखमी
रत्नागिरी जिल्ह्यासह चिपळूण तालुक्यामध्ये मध्ये विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात वीज अंगावर पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आठ जण जखमी झाले आहेत. भात कापणीच्या वेळी हा प्रकार घडला ही घटना चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे-बौद्धवाडी येथे बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुशील शिवराम पवार (३८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या सर्वत्र शेत कापणीचे काम सुरू आहे.
अचानक विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला, तसेच रत्नागिरी तालुक्यातही करबुडे येथे वीज पडण्याचा प्रकार घडला त्याचप्रमाणे, चिपळूण तालुक्यात देखील
बुधवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या जोरदार कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. मुर्तवडे-बौद्धवाडीच्या शेतात कापणीचे काम सुरू असताना वीज कोसळल्याने सुशील शिवराम पवार या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, शेतात काम करणाऱ्या इतर आठ जणांना विजेचा धक्का बसून ते गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी झालेल्यांमध्ये उत्तम भिवा पवार (५८), उर्मिला उत्तम पवार (52), रोशन रामदास पवार (14), सुजाता रामदास पवार (40), संचिता संदीप पवार (45), संदीप लक्ष्मण पवार (50) आणि सुलोचना नारायण कांबळे (37) संतोष विठ्ठल कांबळे (55) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मुर्तवडे बौद्धवाडीचे रहिवासी आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




