
धामणसे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वछता व श्रमदान मोहीम उत्साहात

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत धामणसेमार्फत संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थ व बचत गटाच्या सहकार्याने आज एक दिवस स्वछता व श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये सरपंच अमर रहाटे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुलकर्णी आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
अभियानाची जनजागृती करण्यासाठी तसेच कराची वसुली करण्यासाठी सर्व वार्ड मेम्बरच्या नेतृत्वाखाली वार्ड सभा कॉर्नर सभा घेण्यात आल्या. सर्व उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. अभियानाला आर्थिक स्वरूपात सुद्धा लोकवर्गणी प्राप्त होत आहे प्रत्यक्ष कुटुंबाने २०० रुपये लोकवर्गणी देण्याचा निर्धार ग्रामसभेमध्ये करण्यात आला आहे. तसेच गावातील संस्था, श्री रत्नेश्वर वाचनालय, विविध कार्यकारी सोसायटी, हायस्कूल, शाळा सुधार समिती व इतर स्थानिक संस्था यांच्यामार्फत सुमारे २० हजार रुपये लोकवर्गणी प्राप्त झाली आहे. तसेच उपसरपंच सौ. ऋतुजा कुलकर्णी यांनी आपले एक महिन्याचे मानधन रुपये तीन हजार या अभियानासाठी लोकवर्गणी म्हणून दिले आणि गावातील शिक्षकांनी सुद्धा या अभियानात सहभागी होऊन लोकवर्गणी सुद्धा दिली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान यशस्वी करण्याचा निर्धार धामणसे ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी उपस्थित तालुका अध्यक्ष देविदास इंगळे, जिल्हा सचिव संजय दळवी, जिल्हा महिला संघटक सानिका शिंदे, प्रभारी सचिव जी. के. खरंबाळे, महिला उपाध्यक्ष पुजा कोकरे, जिल्हा माहिती प्रमुख संजय कुंभार, विष्णुदास बुंदे, सुरेश भगत, संतोष रोकडे, उल्हास कोळी, विजय बेंदे, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला वर्ग, गामस्थ उपस्थित होते.




