
राजापूर तालुक्यातील तेरवणमध्ये तरुणीची गळफास घेत आत्महत्या
राजापूर तालुक्यातील तेरवण बाईंगवाडी येथील जयश्री हरी जुवळे (२७) या तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. मृत तरुणी मनोरुग्ण असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. या प्रकरणी तारामती जुवळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात खबर दिली. जयश्री जुवळे हिच्यावर रत्नागिरी येथील जिल्हा मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. तेथील गोळ्या, औषधे सुरू होते. दरम्यान बुधवारी दुपारी जयश्री ही घरी एकटीच असताना तिने नायलॉनच्या ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.www.konkantoday.com



