कोकणातील प्रसिद्ध हातीसच्या पिर बाबर शेखच्या हुरुसाला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पारंपरिक पद्धतीने सुरवात

कोकणातील महाराष्ट्रातील प्रसिद्ध हातीसच्या पिर बाबर शेखच्या हुरुसाला शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पारंपरिक पद्धतीने गालिब मिरवणुकिने शुभारंभ करण्यात आला. इब्राहिम पट्टनहून आलेल्या समस्त मानकरी ग्रामस्थांची मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीने सुरवात झाली. विधिवत प्रचलित धार्मिक विधी दोन्ही कडच्या मंडळी मानकर्‍याच्या वतीने धर्मीक विधिना प्रारंभ झाला. हातीस ग्रामविकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर शासकिय नियमांचे पालन करत यात्रा मोठी भरविली नसली तरी स्थानिक पातळीवर गावकऱ्यांच्या मानकर्‍याच्या सहभागाने हुरुसाचे धर्मीक कार्यक्रम पारंपरिक रित्या पार पाडण्यात येत आहेत.
यंदा यात्रा नसली तरीही अनेक भाविकांना या उत्सवाचे आपल्या घरातून लाईव्ह दर्शन आयोजकांनी घडवले आहे. व या उत्सवात भाविकांनी लाईव्ह दर्शनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे असे लाईव्ह करणाऱ्या आयोजकांनी सांगितले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button