अवघ्या २ वर्षे ९ महिनाच्या स्वराने रचला इतिहास
OMG बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान


कु. स्वरा श्रीकांत वाघमारे – वय २ वर्षे ९ महिने..एक विलक्षण दैवी देणगी लाभलेली एक इवलीशी चिमुरडी .पण या चिमुरडीची अफाट बुद्धिमत्ता जर आपण पहिली तर डोळ्याचे पारणे फिटते.
योग्य मार्गदर्शन आणि मानवी मेंदूची शक्ती
कु स्वरा,अवघ्या २वर्षे ९ महिन्याची आहे. अजून नीट बोलू शकत सुद्धा नाही, पण ही चिमुरडी १४०० हुन जास्त इंग्रजी शब्द चित्रावरून ओळखते.आज रोजी ती तब्बल १४०० हुन जास्त चित्रे मग ज्यामध्ये अनेक वस्तू ,अनेक प्राणी ,फळे ,गाड्या, अनेक देशांचे राष्ट्रीय ध्वज, लहान गणिते ,तर कधी अनेक राष्ट्रीय महान व्यक्ती ज्यात नेताजी सुभाष चंद्र बोस ,महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गुरुदेव रवींद्र टागोर वीर सावरकर ,दादाभाई नौरोजी, डॉ अब्दुल कलाम सर,नेल्सन मंडेला भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू देखील आहेत. ते ही चिमुरडी अगदी नाव उच्चरातच तात्काळ दाखवते.
लहान मुलांवर “कोवळ्या वयात जर योग्य संस्कार जर आई वडील आणि गुरुजनांनी केले ,तर त्याचे किती सुपीक परिणाम या लहान वयात कोवळ्या वयाच्या मुलांवर बिंबतात, याचे हे सुंदर उदाहरण आहे. याचीच दखल घेत ‘OMG च्या बुक ऑफ रेकॉर्ड, इडिशन २०२० मध्ये स्वराला स्थान देण्यात आले आहे.
स्वराला या कामी आईवडिलांचे मार्गदर्शन लाभले. स्वराचे वडील श्री. श्रीकांत वाघमारे ( MA. BEd) हे पुण्यात राहतात .आई सौ बुद्धशीला श्रीकांत वाघमारे (BA ) हे दोघेही उच्चशिक्षित असून माईंड पॉवर प्रशिक्षक आहेत. ते मूळचे नांदेड (बारुळ ता.कंधार) येथील रहिवासी आहेत. ग्रामीण भागातून येऊन सुद्धा प्रचंड आत्मविश्वास आणि बुद्दीमत्तेच्या जोरावर श्रीकांत सरांनी आपल्या मुलीवर जे संस्कार केले आहते त खरोखर प्रशंसनीय आहेत. आज श्रीकांत सर बुद्धिमत्ता ट्रेनर ,/माईंड पॉवर ट्रेनर आहेत आणि ते मुलांना अगदी चित्रे ओळखण्यापासून ते लहानसहान गणिते पटापट सोडवण्यास मुलांना प्रशिक्षण देतात आणि त्यात अगदी मास्टर करतात ,याचीच ही झलक .या सर्व प्रशिक्षण सुंदर प्रयोग त्याने स्वतः आपल्याच २ वर्षाच्या चिमुरडीवर अगदी यशस्वी केला आणि तो १०१ टक्के सफल झाला.आहे.
ज्यांना त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ ज्या मित्रमंडळींना आणि पालकांना घेऊ शकतात,त्याच्या साठी संपर्क क्रमांक देत आहे श्रीकांत वाघमारे सर ८८६२०४५८५१
९९६०८५१५१६
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button