आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन त्यांना धमकी आली आहे. यासंदर्भात एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर तक्रार दाखल केली आहे.ही धमकी कुख्यात गुंड आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील गँगकडून एकनाथ खडसे यांना धमकी आली होती. १५ आणि १६ एप्रिल रोजी हे फोन आले होते.छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम तुम्हाला मारणार आहे, असे धमकी देणाऱ्याने पहिल्यांदा फोनवरुन सांगितले. त्यानंतर खडसे यांनी तो प्रकार गंभीरतेने घेतला नाही. त्यानंतर दुसऱ्या फोनवरुन पुन्हा फोन आला की तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काहीच केले नाही. तुम्हाला ही लोक मारणार आहेत. चार ते पाच वेळा असे फोन आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी तक्रार दाखल केली आहे. हे फोन अमेरिका आणि उत्तर प्रदेशातून लखनऊमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button