
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर गावाजवळ कार पलटी होऊन अपघात, चार जण जखमी
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर गावाजवळ मुंबईहून संगमेश्वर कडे जाणाऱ्या एका भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी एक महिला गंभीर जखमी आहे. ही घटना रविवारी घडली.
एम.एच.०१४ एल.पी. ३१६४ क्रमांकाची हुंडाई कार मुंबईहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत होते. बोरघरजवळ आल्यानंतर अचानक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात गाडीतील चारही प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींपैकी एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याचे समजते. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.