
ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत
राज्य शासनाकडून ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने पुन्हा एकदा रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतला आहे. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आखलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमानुसार ७ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद रत्नागिरीवर मोर्चा काढणार आहेत. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे.
या मोर्चानंतर १८ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्यभरातील कर्मचारी एकत्र येऊन मोर्चा करतील. यानंतरही जर शासनाकडून मौराण्यांकडे दुर्लक्षच झाले तर सप्टेंबर २०२५ पासून सातारा येथे बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे, असा ठराव राज्य बैठकीत सर्वानुमते पारित करण्यात आला.www.konkantoday.com




