
दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच केला आपल्या भावाचा खून
रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारी घटना दापोलीत घडली आहे दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय 36, रा. उन्हवरे बौद्धवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी मध्यरात्री हा खून करण्यात आला असल्याचे बोलले जात असून दापोली पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भावाने भावाचा खून का केला याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या खुनाचा तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.