
लांजा गव्हाणे येथे विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू.
लांजा गव्हाणे येथील दत्तू काळू कांबळे (वय ९०) यांचा विषारी औषध सेवन केल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना १७ जुलै २०२५ रोजी पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी घडली.१५ जुलै रोजी कांबळे हे घरी असताना उंदीर मारण्यासाठी ठेवलेल्या विषारी औषधाच्या दाण्यासारख्या गोळ्या त्यांनी खाल्ल्या. यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान १७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.