खेड तालुक्यातील घाणेखेंडमध्ये तरुणाची गळफासाने आत्महत्या


खेड तालुक्यातील घाणेखुंट-गवळवाडी येथे २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. नरेंद्रसिंग मदनसिंग चौहाण (रा. घाणेखुंट-गवळवाडी मूळगाव राजस्थान) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो हार्डवेअरच्या दुकानात कामाला होता. दुकानात कामावर न आल्याने त्याच्या भावाने मोबाईलवर संपर्क साधला असता काही प्रतिसाद दिला नाही. भाऊ घरी आल्यानंतर त्याला नरेंद्रसिंग याचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button