लांजातील खोकेधारकांना हटवाल तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, शिवसेना ठाकरे गटाचा इशारा.

गेली अनेक वर्षे लांजा शहरात छोटा मोठा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणार्‍या खोके धारकांना अनधिकृत ठरवून प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे कदापी सहन करणार नाही. शासनाच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करून आम्ही खोके धारकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, वेळप्रसंगी तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी दिला.लांजा शहरात मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र हे काम सुरू असताना त्या कामामध्ये अडथळा येवू नये म्हणून रस्त्यावर छोटा मोठा व्यवसाय करणार्‍या खोकेधारकांना अनधिकृत ठरवून दि. ३ जुलै पर्यंत हे सर्व व्यवसाय बंद न केल्यास अथवा खोके न हटविल्यास त्यांच्यावर पोलिसांच्या सहाय्याने दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरपंचायत व लांजा तहसिलदार कार्यालय यांनी दिला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button