हिंदी-मराठीवरून राजकारण तापलं, आझाद मैदानात उद्धव ठाकरेंनी ‘जीआर’ची केली होळी


मुंबईत हिंदी आणि मराठी भाषेवरून राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आज रविवारी दुपारी आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या सरकारी आदेशाच्या (जीआर) प्रती जाळून निषेध केला आहे.या निषेधाचं नेतृत्व स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरेंसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची’ अशी घोषणाबाजी करण्यात आली.उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर सभा आणि होळीची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज रविवारी आझाद मैदानाजवळ मुंबई मराठी पत्रकार संघ परिसरात ही होळी करण्यात आली आहे. यावेळी हिंदी भाषेच्या निर्णयाच्या शासन आदेशाची होळी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहे. मराठी मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे मनसेचे नेते व कार्यकर्ते देखील या होळीला उपस्थित आहेत. या राजकीय होळीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button