
दाभिळ कुंभारवाडी जांभुळवाडी येथील सात वर्षीय बालिकेचे सर्पदंशाने निधन.
खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी जांभुळवाडी येथील कुमारी सान्वी संदेश पडवेकर, वय ७ वर्ष हिचे सर्पदंशाने निधन झाले. दरम्यान याबाबतचे वृत्त असे की, सान्वी ही शाळेतून परतल्यानंतर आपल्या अंगणात खेळत असताना तिला काहीतरी चावले असल्याचे आई-बाबांना सांगितले. दरम्यान सान्वीचे वडील संदेश व आई सरस्वती यांनी तात्काळ जवळच असलेल्या लोटे येथील साईकृपा हॉस्पिटलमध्ये सान्वीला दाखल केले. डॉक्टरांनी पायाला सूज व दातात रक्त येत असल्याने तात्काळ डेंटल हॉस्पिटलला जाण्यास सांगितले.
खेड येथील डेंटल हॉस्पिटलमध्ये दातातून रक्त येत असल्याने तिच्यावर उपचार केले परंतु तेथेही योग्य उपचार न झाल्याने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. दरम्यान तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिला कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे योग्य ते उपचार करून डॉक्टरांनी कोल्हापूर येथील दवाखान्यात उपचारासाठी पाठवले. परंतु तेथेही अपयश आल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.