
देवरुख नजीकच्या विघ्रवली माळवाडी येथे कामगारानेच मारला रोख रकमेवर डल्ला
देवरुख नजीकच्या विघ्रवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशनच्या काऊंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. येथील एका कर्मचार्यावर संशय व्यक्त केला असून मंगळवारी त्याच्यावर गुन्हा बाखल करण्यात आला आहे.
याबाबत फाऊंडेशनचे श्रीकृष्ण पालेकर यांनी फिर्याद दिली आहे. राकेश मेस्त्री (३२, काटवली ढोसळवाडी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पालकर फाऊंडेशन विभागात ज्येष्ठ नागरिकांची ७८ हजार ८०० रूपये रक्कम जमा झाली होती. काऊंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या या रकमेतून ५० हजार २०० रुपये लंपास झाले. राकेश मेस्त्री याने ही रक्कम लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानुसार राकेश याच्यावर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरीचा पर्दाफाश करण्यासाठी फॉरेन्सीक लॅब व्हॅन बुधवारी देवरुखात दाखल झाली होती.




