राजापुरात मोकाट जनावरांविरोधात नगर परिषद ’ऍक्शन’ मोडवर.

राजापूर शहरात फिरणार्‍या मोकाट जनावरांना राजापूर नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत पकडून तात्पुरत्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात येणार असून ३ दिवसात जर मालकाने दखल घेतली नाही तर अशा मोकाट गुरांचा लिलाव करण्यात येणार आहे. जोडीलाच संबंधित गुरांच्या मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार असून दंडवसुलीही केली जाणार आहे, तशी माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली.शहरात सध्या कोणत्याही रस्त्यावर अहोरात्र झुंडीने मोकाट गुरे फिरताना दिसत आहेत. या गुरांचे मालक बेफिकीर असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालक, नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी तर अपघातांचे प्रकार घडत आहेत. मोकाट गुरांच्या मालकांवर पशु कायद्याला अनुसरून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी झाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button