सावर्डे येथे महावितरण सबस्टेशनशेजारील एका मोकळ्या जागेतून सुमारे ७४ लाख ८४ हजार रुपयांचे लोखंडी इलेक्ट्रिक खांब चोरीला


चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे महावितरण सबस्टेशनशेजारील एका मोकळ्या जागेतून सुमारे ७४ लाख ८४ हजार रुपयांचे लोखंडी इलेक्ट्रिक खांब चोरीला गेल्याची धक्कादायक घटना काल, गुरुवारी (६ जून) सायंकाळ ते मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी सावर्डे पोलिसांनी भारतीय दंड संहिता २०२३ च्या कलमांन्वये चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, रा. हनुमान पेठ, खेड, मूळ रा. विरार, पालघर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. महावितरणने आपले ४५० लोखंडी इलेक्ट्रिक खांब सावर्डे येथील सचिन वारे यांच्या वहाळफाटा येथील मोकळ्या जमिनीमध्ये ठेवले होते. ६ जून रोजी सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान, कंपनीच्या संमतीशिवाय अज्ञात आरोपींनी संगनमताने हे खांब चोरून नेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button