
रत्नागिरीत पर्यटनासाठी व देवदर्शनासाठी आलेल्या महिलेचा हाॅटेलमध्ये झाेपेत मृत्यू
मुंबईहून पर्यटन आणि देवदर्शनासाठी रत्नागिरी येथे आलेल्या महिलेचा झाेपेत मृत्यू झाला. नीता नरेंद्र मेस्त्री (रा. नालासाेपारा, जि. पालघर, मूळ रा. देवाचे गाेठणे, ता. राजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. मेस्त्री या त्यांच्या दाेन मुले आणि दाेन बहिणींच्या कुटुंबासाेबत 15 मे राेजी रत्नागिरीत आल्या हाेत्या. हे कुटुंब रत्नागिरी शहरातील माळनाका येथील एका हाॅटेलमध्ये मुक्कामाला हाेते. 16 मे राेजी या कुटुंबाने देवाचे गाेठणे येथे जाऊन देवदर्शन घेतले. शुक्रवारी रात्री जेवणानंतर सर्व कुटुंबीय झाेपले. शनिवारी पहाटे सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास मेस्त्री या झाेपेत घाेरत हाेत्या. मात्र, अचानक त्यांचे घाेरणे थांबले. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बेशुद्ध पडल्या हाेत्या. तात्काळ नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घाेषित केले.www.konkantoday.com