बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन

*रत्नागिरी, दि. ८ : कल्पना नरेश विश्वकर्मा वय 40 या गॅलेक्सी अर्पाटमेंट, उद्यमनगर रत्नागिरी येथून 19 जून 2024 पासून नापता आहेत. त्यांची उंची 5 फुट 5 इंच, रंग गोरा, बांधा मजबुत, डोळे काळे, गळ्यात मंगळसूत्र, नाकात सोन्याची फुली, नेसणीस साडी व ब्लाऊज सोबत पाच हजार रुपये, मोबाईल नाही.

फातिमा तय्यब मेमन वय 23 वर्षे या 04 ऑक्टोबर 2015 रोजी पासून घर नं. 786/1 शुक्राना अर्पाटमेंट राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर रत्नागिरी येथून नापत्ता आहे. त्यांची उंची ५ फुट ३ इंच, रंग सावळा, शरीरयष्टी सडपातळ, उजव्या हाताने आणि पायाने अपंग, अंगात पंजाबी ड्रेस त्यावर काळा बुरखा, पायात पांढरी सँडल आहे.

अनिता सुदाम म्हस्के वय 38 वर्षे व मुलगा किमार अर्जुन म्हस्के वय 5 वर्षे हे दोघे 15 जानेवारी 2017 पासून रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून नापता आहेत. अनिता यांची उंची 5 फूट 1 इंच, डोळे काळे, केस काळे, रंग सावळा, चेहरा उभट, नेसणीस पिवळ्या रंगाची साडी व जांभळ्या रंगाचा ब्लाऊज व मुलगा किमार यांची उंची 3 फूट 4 इंच, रंग निमगोरा, चेहरा उभट, डोळे काळे, केस काळे, बारीक नेसणीस फिक्कट आकाशी रंगाचा बंद गळ्याचा टी शर्ट आहे.

वरील नापत्ता व्यक्तींबाबत आपल्याला माहिती मिळाल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button