
चिपळूण तालुक्यातील फुरुस ते दुर्गेवाडी मार्गावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू.
चिपळूण तालुक्यातील फुरुस ते दुर्गेवाडी मार्गावर दुचाकीने प्रवास करतेवेळी दुचाकी रस्त्यालगतच्या सिमेंटच्या कठड्याला आपटून अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार मनोज निलकंठ पोंक्षे (७२, पाग) यांच्यावर खासगी रग्णालयांत उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज पोंक्षे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीने तालुक्यातील फुरुस ते दुर्गेवाडी मार्गावर प्रवास करत होते. यावेळी तीव्र उतारावरुन जातेवेळी दुचाकी काजूचे वाकण येथे आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या कठाड्याला जोरदार आपटली व गटारात पडली. या अपघातात मनोज पोंक्षे हे गंभीर जखमी झाले. यावेळी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान पोंक्षे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात पोंक्षे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com