
ड्रोनच्या यंत्रणेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात तीन महिन्यात २९५ नौकांना टिपले, ३१ लाखांचा दंड.
राज्यासह कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी करणार्या परप्रांतीय नौकांसह अवैधरित्या मासेमारी करणार्या स्थानिक नौकांवर ड्रोनद्वारे ’वॉच’ ठेवला जातोय. गेल्या तीन महिन्यात ड्रोनने २९५ नौकांना दोषी ठरवले आहे. त्यामध्ये ३० परराज्यातील नौकांचा समावेश आहे. तर ५० नौकांवरील खटले निकाली काढत त्यांना ३१ लाख १२ हजार रु.चा दंड करण्यात आला आहे. उर्वरित नौका चालकांवर लवकरच दंडांचा बडगा उभारला जाणार आहे.
राज्यासह कोकण, रत्नागिरीच्या सागरी हद्दीत घुसून कर्नाटकसह अन्य राज्यातील नौका धुमाकूळ घालत होत्या. समुद्रात त्यांची मुजोरी वाढली होती. त्यांच्याकडून स्थानिक मच्छीमारांना मारहाणही केली जात होती. तर कोकण किनार्यावरील मच्छी लूटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू होते.परप्रांतीय नौकांवर वॉंच ठेवण्यासह स्थानिक अवैधरित्या मासेमारी करणार्या नौकांवर कारवाई करण्यासाठी किनारपट्टीवरील हर्णे (दापोली), नाटे (राजापूर), रत्नागिरी या तीन ठिकाणी ड्रोन लावण्यात आले आहेत. त्याद्वारे समुद्रातील हालचाली टिपल्या जात आहेत.www.konkantoday.com