अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात जलसमाधीचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यावरच गुन्हा दाखल.

चिपळूण तालुक्यातील करंबवणे, केतकी, गोवळकोट येथील अनधिकृत वाळू उत्खनन व वाळू वाहतुकीवरच्या कारवाईसाठी येथील तरूण कार्यकर्ते श्रीकांत कांबळी यांनी गुरुवारी थेट केतकी येथील खाडीत उडी घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे एकच खळबळ उडाली. धावाधाव उडालेल्या पोलिसांनी काही वेळानंतर त्यांना पाण्याबाहेर काढत उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तहसिलदार यांनी अवैध वाळू उत्खननावर कारवाईचे आश्वासन दिले असतानाही कांबळी यांनी आंदोलन केल्याने चिपळूण पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिपळूण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून येथे अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी श्रीकांत कांबळी यांनी काही दिवसांपूर्वी तहसिलदारांकडे केली आहे. तरीही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करीत कांबळी यांनी १ मे रोजी आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी गुरुवारी वाळू उत्खननाचे मुख्य केंद्र असलेल्या केतकी येथे खाडीत उडी मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनासह पोलिसांचीही धावाधाव उडाली. अखेर पोलिसांनी नदीत उड्या मारत त्याला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारांसाठी कामथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button