शिवसैनिकांनी गावागावात शिवसेना शाखा मजबूत केल्या पाहिजेत मंत्री उदय सामंत यांचे सिंधुदुर्गात आवाहन.

सावंतवाडी – वेंगुर्ला- दोडामार्ग- मालवण- कुडाळ येथील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पक्षाला बळकट करण्यासाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान अतिशय महत्वाचे असल्याने सर्व शिवसैनिकांनी जोमाने या अभियानात कामाला लागले पाहिजे व गावागावात शिवसेना शाखा मजबूत केल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केल्या.शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत आढावा बैठक मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी पार पडली.

त्यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी दौऱ्याबाबत सर्वांना महत्वाच्या सूचना यावेळी दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे व संजय पडते, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, महिला जिल्हा प्रमुख निता सावंत, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, वेंगुर्ला तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, रुपेश पावसकर, वेंगुर्ला महिला तालुका प्रमुख दिशा शेटकर, उपजिल्हाप्रमुख सुनिल दुबे, आजगाव सरपंच यशश्री सौदागर, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद ढेरे, महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button