जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटी; रामबनमध्ये जमीन खचली, रस्ते वाहून गेले


जम्मू-कश्मीरमध्ये ढगफुटी होऊन झालेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरामुळे आणि जमीन खचल्यामुळे जम्मू येथील विविध ठिकाणी तसेच कश्मीरमधील रामबन जिह्यात अक्षरशः हाहाकार माजला. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.अनेक घरे आणि रस्ते वाहून गेले असून यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून आतापर्यंत 100 हून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

रामबन जिह्यातील बनिहाल परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. त्यामुळे जम्मू ते श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. शेकडो वाहने भूस्खलनामुळे जमिनीखाली गाडली गेली असून अनेक वाहने अडकून पडल्याचे चित्र आहे. किश्तवाड-पद्दर रस्ताही बंद असून येथील अवजड वाहतूकही थांबवण्यात आली आहे. भूस्खलनामुळे डोंगरावरील जमीनही खचली आणि घाटातून सुरू असलेली अवजड वाहतूक खोळंबली.
भूस्खलनामुळे नशरी ते बनीहालदरम्यान डझनभराहून अधिक ठिकाणी मातीचा ढिगारा आणि दरडी कोसळल्या. त्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. परिणामी 250 किलोमीटरच्या या महामार्गावर 100 हून अधिक प्रवासी अडकून पडले. प्रत्येक ऋतूत कश्मीर आणि संपूर्ण देशाशी कनेक्ट असणारा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button