सिंधुदूर्ग पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील 13 पोलिस ठाण्यातील ‘दामिनी’ पथकांना दुचाकींच्या चाव्यांचे वितरण.

सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने जिल्ह्यातील 13 पोलिस ठाण्यातील ‘दामिनी’ पथकांना दुचाकींच्या चाव्यांचे वितरण बुधवारी कणकवली पोलिस स्टेशन येथे अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्य हस्ते व अति.पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कणकवलीचे उपअधीक्षक घनश्याम आढाव, सावंतवाडीचे उप अधीक्षक विनोद कांबळे, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप, विशेष शाखेचे पोलिस निरीक्ष सचिन हुंदळेकर, दोडामार्ग पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, कणकवलीचे सहा.पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत यांच्यासह त्या त्या पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक, अधिकारी, कर्मचारी तसेच महिला दक्षता कमिटी सदस्या मेघा गांगण, डॉ. सौ. प्रतिमा नाटेकर उपस्थित होत्या.दामिनी पथकांना महिलांच्या सुरक्षेसाठी घटनास्थळी तातडीने पोहोचण्यासाठी त्यांना विशेष दुचाकी देण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस दल महिलांच्या सुरक्षेसाठी सक्षम आणि सज्ज असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button