मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले


मॅनेजमेंट गुरू’ म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे डबेवाले बुधवार, 9 एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. 9 ते 14 एप्रिल या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत.15 एप्रिलपासून पुन्हा डबेवाले नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन सेवा देतील.

मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठय़ा प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये वेळेत डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावाकडील ग्रामदैवत, कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे या कालावधीत डबे पोहोचवण्याची सेवा बंद राहील. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button