
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा सोमवारी गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा.लि मध्ये
रत्नागिरी, दि.4 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जिल्हयातील रोजगार इच्छुक महिला उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने 200 हून अधिक महिला 10 वी पास / नापास, 12 वी पास पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 7 एप्रिल सकाळी 10 वाजता, गद्रे मरिन एक्सपोर्ट प्रा.लि. एम.आय.डी.सी. मिरजोळे ब्लॉक येथे करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. नोंदणी केलल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने दिनांक 7 एप्रिल रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावामध्ये ऑनलाईन अप्लाय करुन रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.