तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ.

शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या मेसेजने खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची 1 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती.विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन आरोपीने स्वत:देखील आपलं जीवन संपवलं होतं.

या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करत धमकी देण्यात आली आहे. ‘लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद’, अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे, लालचंद हे अभिषेक घोसळकर हत्याप्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यामुळे, तेजस्वी घोसाळकर यांनी याबाबत पोलिसात (Police) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. लालचंद पाल यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button