
कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हर वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाल्या होत्या त्यामुळे मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आता ही वायर जोडण्यात आली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वे यांच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या काही गाड्या अजूनही काही स्थानकात थांबवण्यात आले आहेत आता हे वाहतूक सुरू झाली तरी अनेक गाड्या उशिरा धावत आहेत