
ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश ठीक यांचे निधन.
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी आणि कुणबी समाज सेवा संघ नाचणे रत्नागिरीचे संस्थापक सदस्य प्रकाश सोनू ठीक (६५) यांचे सोमवार १७ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने येथील नाट्य कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ठीक हे रत्नागिरीत गेली अनेक वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत होते.
येथील ऑक्टेल केमिकल्स कंपनीत ते कामाला होते. तसेच नाट्यक्षेत्राशी निगडित जिज्ञासा या संस्थेतही ते सुरूवातीच्या काळात क्रियाशील होते. त्यानंतर रंगकर्मी रवींद्र साळुंखे यांच्या सोबतीने त्यांनी संकल्प कलामंच नाट्यसंस्थेची स्थापना केली. रत्नागिरीतील संकल्प नाट्य कलामंचचे ठीक आयोजक ते रंगभूषाकार म्हणूनही कार्यरत होते. www.konkantoday.com