
गणपतीपुळे पर्यटकांना घेऊन आलेल्या चालकाचा आकस्मित मृत्यू.
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या सांगलीतील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि. 13) फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास घडली. सचिन बबन कापसे (वय 38, रा.जत, सांगली) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत खबर देणारे हे आपल्या कुटुंबासह खासगी गाडीवर सचिन कापसे याला चालक म्हण्ाून घेऊन गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते.
गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास कापसे चक्कर येऊन पडला. त्याल अधिक उपचारांसाठी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकार्यांनी मध्यरात्री 2.25 वा. त्याला तपासून मृत घोषित केले.