मच्छीमारांवरील सततच्या कारवाईने मच्छीमार हैराण, मत्स्य सहाय्यक आयुक्तांची घेतली भेट.

शासनाने समुद्रातील दहा वावाच्या आत मासेमारी करण्यास घातलेल्या बंदीविरोधात रत्नागिरीतील मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालया कडे धाव घेतली. ड्रोनद्वारे समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या हवाई गस्तीत दहा वावाच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणार्‍या मासेमारी नौकांची छायाचित्रे घेतली जातात आणि मच्छीमारांवर दंडात्मक कारवाई केली जाते.या संदर्भात लक्ष घालून न्याय मिळवून द्या, अशी विनंती मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली. या वेळी मच्छीमारांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून देऊ, असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छीमारांना दिले.

अवैध मासेमारी रोखण्यासाठी १० जानेवारीपासून समुद्रकिनार्‍यावर ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. या संदर्भातील अडचणी सांगण्यासाठी मच्छीमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांची भेट घेतली. मच्छीमार नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, काँग्रेस नेते दीपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी ड्रोन कारवाईसंदर्भात व्यथा मांडल्या. रत्नागिरी समुद्रकिनारा वगळता रायगड व इतर समुद्रकिनारी पाच वाव अंतराचा नियम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button