रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वर्षभरात आढळले ४१ कॅन्सर रूग्ण.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत येथील जिल्हा रूग्णालयात केलेल्या तपासणीत एकूण ४१ कर्करोगांचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ओरल कॅन्सर १०, ब्रेस्ट कॅन्सर १४, सर्जिकल कॅन्सर १ आणि इतर कॅन्सरचे १६ अशी रूग्णसंख्या असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी माहिती दिली.

चार रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व रूग्णांवर जिल्हा शासकीय रूग्णालय येथे मोफत किमोथेरपी उपचार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button