मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथील कोकजे वठार येथे नॅनो जळून भस्मसात…

आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर निवळी येथील कोकजे वठार येथे भर रस्त्यात नॅनो गाडीने अचानक पेट घेतला.नॅनो गाडीने पेट घेतल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली होती.

दरम्यान पेटलेल्या नॅनो ची पूर्ण राख झाल्याने एकच खळबळ उडाली होती मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई गोवा महामार्गावरील कोकजे वठार येथे महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या होत्या.दरम्यान या नॅनो कशामुळे पेट घेतला याचा पोलीस तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button